या संकेतस्थळावर माझ्याविषयी आणि म.न.से विषयी सर्वव्यापी माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून वेल्हे तालुक्यातील नागरिकांच्या तसेच तरुणांच्या छोट्या - मोठ्या समस्या, त्यांची मते, त्यांच्या सूचना माझ्यापर्यंत पोंचविण्यासाठी व्हावा अशीदेखील माझी ईच्छा आहे.

नागरिकांच्या प्रश्नांविषयी, सरकारच्या धोरणांविषयी अनुभवांती माझी मते मांडण्यासाठी हे संकेतस्थळ एक व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून तालुक्यातील समस्या मांडण्याचा आणि त्या सोडवण्यासाठी केलेला प्रयत्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे .तसेच तालुका प्रगत करण्यासाठी आपली अमूल्य मते मांडण्यासाठी आपले स्वागत आहे...

आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे, संगणकाचे युग आहे. प्रचंड धावपळीचे आणि संपूर्ण सर्वत्र स्पर्धेचे युग आहे. जो थांबला तो संपला. दिवसेन्दिवस लोकसंख्या ही वाढतच आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शेकडो कामगारांचे काम केवळ एक मशिन करू लागले. त्यामुळे बेरोजगारी आणि बेकारी ही वाढली. महागाई वाढून सर्वच गोष्टींचे दर अगदी गगनाला भिडले आहेत. एकेकाळी ऐश्वर्य संपन्न असलेल्या वेल्ले तालुक्यात आज मात्र फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे सोन्याचा धूर निघत असे. त्यांनी सोन्याचा नांगर धरून शेतीचा श्री गणेशा केला. सर्वत्र अगदी कुशल मंगल होते. लोक आनंदात गुण्यागोविंदाने राहत होते. महाराजांनी अपल्या आयुष्यातील सर्वात जास्त काळ या भागात घालविला. स्वराज्य स्थापन करीत असताना स्वराज्याचे तोरण त्यांनी ज्या गडावर बांधले व आपल्या महान कारकिर्दीला सुरुवात केली तो किल्ला तोरणा (प्रचंडगड) आपल्या वेल्ले तालुक्यातीलच. शेजारीच असणारा राजगड किल्ला ही राजधानी होती तो सुद्धा याच तालुक्यातील एवढा मोठा प्रचंड ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हा आपला वेल्ले तालुका आहे.

शिवकाळात वैभव संपन्न असणाऱ्या आपल्या तालुक्याला आजमात्र दुर्गम डोंगरी, अतिमागास म्हणून हिणविले जाते आहे. प्रगती पासून वंचित ठेवले जात आहे. याला जबाबदार कोण? तर साहजिकच येथील राजकीय सत्ताधारी वर्चस्व, गेली चाळीस वर्षे ज्यांनी या तालुक्यात सतत अबाधित सत्ता टिकवली व भोगली ते जबाबदार आहेत. या गोष्टीला त्यांनी विकासात्मक ठोस पावले म्हणावी तशी आणि म्हणावी तितकी कधी उचललीच नाहीत. शेजारील तालुक्यांच्या मानाने (भोर,मुळशी,हवेली,पुरंदर) आपला वेल्ले तालुका मात्र खूप मागे आहे. जी काही थोडीफार विकासकामे झाली टी चाळीस वर्षाच्या सत्तेच्या मानाने खूप कमी आहेत. शेजारील भोर तालुक्याचे नगरपालिकेत रुपांतर झाले. वेल्ल्यात मात्र तालुक्याच्या मानाने काहीच नाही. भोरला स्वतंत्र असे नाव आणि ओळख आहे. तेथील पायाभूत सेव्स सुविधा भरपूर आहेत. मग ती पंचायत समितीची सुसज्ज अशी इमारत असो, बाजारपेठ असो, कारखानदारी असो, बस स्थानक असो, न्यायालय असो, सर्व काही ठीकठाक आहे. वेल्ल्याला तर साधे बस स्थानक सुद्धा नाही. इस टी सेवा पण दिवसभर सुरळीत नाही, त्यासाठी योग्य नियोजन नाही. कमीत कमी दर एक तासाने एक बस असे नवीन वेळापत्रक तयार व्हायला पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांच्या वेळेत जाते वेळी व येतेवेळी किमान एक एस टी सोय व्हायला हवी. त्यासाठी वेगळे नियोजन हवे.

तालुक्यातील जनतेला एक ना दोन अशा प्रकारच्या समस्यांना रोज सामोरे जावे लागते. मग ती इलेक्ट्रिक बोर्डाची लोडशेडिंग समस्या, पाण्याची समस्या, रस्त्याची दुरावस्था, अंतर्गत रस्ते, आरोग्य विषयक समस्या अशा खूप समस्या सतत भेडसावत असतात. या सर्व गोष्टींचा आढावा घेउन विंझर येथील तरुण तडफदार युवा नेतृत्व श्री. संतोष आप्पा दसवडकर यांनी पुढाकार घेऊन तालुक्याच्या राजकारणात सहभागी होऊन तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ठोस पाऊले उचलली आहेत. त्यांना तालुक्याला लागलेले दुर्गम व अतिमागास हे कलंक मिटवून टाकायचे आहेत. ह्या साठी त्यांना आपल्या तालुका वासियांची साथ हवी आहे. आपले सहकार्य हवे आहे. जर आपण बरोबरीने चाललात तरी नक्कीच तालुक्यचा कायापालट करून दाखवू. जे चाळीस वर्षात जमले नाही ते पाच वेळर्शात करून दाखवू.

संतोष आप्पा दसवडकर फौंडेशनच्या वतीने अनेक कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले. भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून अनेक कुस्ती शौकिनांचे व पैलवान मंडळीचे मन जिंकले. त्यांनी स्वखार्चाचे विठ्ठलवाडी (विंझर) येथे मंदिरासमोरील कट्टा, पराचे काम केले. तसेच नळ पाणी आयोजानेसाठी, विहिरीसाठी सुद्धा स्वतः खर्च केला आहेच. त्यांनी वेळोवेळी एम. एस. ई. बी. कंपनीला लेखी निवेदने दिली. त्यासाठी आंदोलन सुद्धा केले. ते सतत सरकारी अधिकाऱ्यांना भेटून अनेक विकास कामाविषयी चर्चा करत असतात.

तालुक्यात जास्तीत जास्त निधी यावा यासाठी झगडतात, पुढील काळात अनेक सेवा, सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार. किल्ल्यांवर रोप वे साठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार, नळपाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते, उच्च शिक्षण, बेरोजगारांसाठी एम. आय. डी. सी. प्रकल्प, तालुक्याला पर्यटन दर्जा व पैकेज साठी प्रयत्न करणार. उच्च श्रेणीतील आरोग्य सेवा धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुनर्वसनाच्या कामात लक्ष घालणार. आंबवणे पर्यंत ओपन कॅनल साठी प्रयत्न करणार. नसरापूर ते वेल्हा वाकण रस्ते, अरुंद पूल यासाठी आंदोलन करणार. सरकारी कार्यालय व पोलीस स्टेशन मध्ये पिडीतांसाठी प्रश्न सोडविण्यास सदैव तत्पर राहणार.