नाव :- संतोष बबन दसवडकर
आईचे नाव :- इंदूबाई
पत्ता :- मु.पो.विंझर, ता.वेल्हा , जि. पुणे
जन्मगाव :- वेल्हे.
जन्मदिनांक :- १६ एप्रिल १९७७
भूषवलेली पदे :-संघटक : भोर विधानसभा


मनोगत :-

आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे, संगणकाचे युग आहे. प्रचंड धावपळीचे आणि संपूर्ण सर्वत्र स्पर्धेचे युग आहे. जो थांबला तो संपला. दिवसेन्दिवस लोकसंख्या ही वाढतच आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शेकडो कामगारांचे काम केवळ एक मशिन करू लागले. त्यामुळे बेरोजगारी आणि बेकारी ही वाढली. महागाई वाढून सर्वच गोष्टींचे दर अगदी गगनाला भिडले आहेत. एकेकाळी ऐश्वर्य संपन्न असलेल्या वेल्ले तालुक्यात आज मात्र फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे सोन्याचा धूर निघत असे. त्यांनी सोन्याचा नांगर धरून शेतीचा श्री गणेशा केला. सर्वत्र अगदी कुशल मंगल होते. लोक आनंदात गुण्यागोविंदाने राहत होते. महाराजांनी अपल्या आयुष्यातील सर्वात जास्त काळ या भागात घालविला. स्वराज्य स्थापन करीत असताना स्वराज्याचे तोरण त्यांनी ज्या गडावर बांधले व आपल्या महान कारकिर्दीला सुरुवात केली तो किल्ला तोरणा (प्रचंडगड) आपल्या वेल्ले तालुक्यातीलच. शेजारीच असणारा राजगड किल्ला ही राजधानी होती तो सुद्धा याच तालुक्यातील एवढा मोठा प्रचंड ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हा आपला वेल्ले तालुका आहे.

पुढे वाचा