संतोष आप्पा दसवडकर फौंडेशनच्या वतीने अनेक कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले.भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून अनेक कुस्ती शौकिनांचे व पैलवान मंडळीचे मन जिंकले.
स्वखार्चाने विठ्ठलवाडी (विंझर) येथे मंदिरासमोरील कट्टा, पराचे काम केले.
नळ पाणी योजानेसाठी, विहिरीसाठी सुद्धा स्वतः खर्च केला आहे.
वेळोवेळी एम. एस. ई. बी. कंपनीला लेखी निवेदने दिली. त्यासाठी आंदोलन सुद्धा केले.
सतत सरकारी अधिकाऱ्यांना भेटून अनेक विकास कामाविषयी चर्चा केली.
वेल्हे तालुक्यात प्रथमच महिलांसाठी देवदर्शन सहल आयोजित केली. या उपक्रमामध्ये महिलांचा प्रतिसाद उल्लेखनीय होता .या सहलीमध्ये ३००० महिलांनी सहभाग घेतला होता. तालुक्यात सर्वात मोठ्या प्रमाणात सहलीचे आयोजन करून महिलानां एकत्र करण्याचे काम केले .




