शिवकाळात वैभव संपन्न असणाऱ्या आपल्या तालुक्याला आजमात्र दुर्गम डोंगरी, अतिमागास म्हणून हिणविले जाते आहे. प्रगती पासून वंचित ठेवले जात आहे. याला जबाबदार कोण? तर साहजिकच येथील राजकीय सत्ताधारी वर्चस्व, गेली चाळीस वर्षे ज्यांनी या तालुक्यात सतत अबाधित सत्ता टिकवली व भोगली ते जबाबदार आहेत. या गोष्टीला त्यांनी विकासात्मक ठोस पावले म्हणावी तशी आणि म्हणावी तितकी कधी उचललीच नाहीत. शेजारील तालुक्यांच्या मानाने (भोर,मुळशी,हवेली,पुरंदर) आपला वेल्ले तालुका मात्र खूप मागे आहे. जी काही थोडीफार विकासकामे झाली टी चाळीस वर्षाच्या सत्तेच्या मानाने खूप कमी आहेत. शेजारील भोर तालुक्याचे नगरपालिकेत रुपांतर झाले. वेल्ल्यात मात्र तालुक्याच्या मानाने काहीच नाही. भोरला स्वतंत्र असे नाव आणि ओळख आहे. तेथील पायाभूत सेव्स सुविधा भरपूर आहेत. मग ती पंचायत समितीची सुसज्ज अशी इमारत असो, बाजारपेठ असो, कारखानदारी असो, बस स्थानक असो, न्यायालय असो, सर्व काही ठीकठाक आहे. वेल्ल्याला तर साधे बस स्थानक सुद्धा नाही. इस टी सेवा पण दिवसभर सुरळीत नाही, त्यासाठी योग्य नियोजन नाही. कमीत कमी दर एक तासाने एक बस असे नवीन वेळापत्रक तयार व्हायला पाहिज




